By  
on  

आता प्रत्येकजण ऐकणार ‘असली हिप हॉप’, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’चा टीजर रिलीज

कलाकार व्यक्तिरेखा उठावदार बनवण्यासाठी मेहनत घेत असतात. त्यांची ही मेहनत उत्तम कलेच्या रुपाने पडद्यावर दिसते. रणवीर सिंग दे देखील अशा कलाकारांपैकी एक आहे. स्वत:ची व्यक्तिरेखा कशी उठावदार बनवायची हे त्याला पुरेपूर ठावूक आहे.

रणवीरच्या ‘गली बॉय’ सिनेमाचा ट्रेलर टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीरने अत्यंत सामान्य कुटुंबातील २६ वर्षीय डिव्हाईन या रॅपरची कथा साकारली आहे. या मुलाला रॅपर व्हायचं असतं. पण आजूबाजूचं वातावरण त्याला पूरक नसतं.

या टीझरमध्ये धारावीतील आसपासचा परिसर दाखवण्यात आला आहे. या टीझरमध्ये आलिया भट, अमृता सुभाष आणि कल्की कोचालिन यांची झलकही दिसते.

हा टीझर रिलीज झाल्यानंतर #gullyboy आणि #aslihiphop हे हॅशटॅग्ज ट्रेंड्मध्ये आहेत. या टीझरमध्ये सिनेमाच्या ट्रेलरची तारीखही दाखवण्यात आली आहे. गलीबॉय सिनेमाचा ट्रेलर ९ जानेवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=z34A-mILN24

Recommended

PeepingMoon Exclusive