शिक्कामोर्तब: रेमो डिसूझाच्या तालावर वरुण धवनसोबत थिरकणार श्रध्दा कपूर

By  
on  

 प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा डान्सवर आधारित तिसरा सिनेमा ज्याचे सध्या ‘स्ट्रीट डान्सर’  आहे, तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात वरुण धवनसोबत बॉलिवूडची ग्लॅम डॉल कतरिना कैफ झळकणार होती. पण काही दिवसांपूर्वीच पिपींगमूनने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिने या सिनेमावर पाणी सोडलं होतं आणि या सिनेमात पुन्हा श्रध्दा कपूरची वर्णी लागणार असल्याचीसुध्दा माहिती देण्यात आली .

यंदा 2019 मध्ये आपले दोन्ही सिनेमे अपयशी ठरल्याने कतरिनाने आता आपला सर्व लक्ष दबंग सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमावर केंद्रित केलं आहे.कतरिनाच्या सर्व तारखा ‘भारत’साठी यापूर्वीच पॅक आहेत. तर रेमो डिसूच्या या डान्सवर आधारित सिनेमासाठीसुध्दा याच तारखांना शुटींग करायची आहे. मग काय, कतरिनाने क्षणाचाही विलंब न लावता सरळ रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डान्सर’वर पाणी सोडून दिलं.

पण अखेर आता ‘स्ट्रीट डान्सर’मध्ये श्रध्दाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून खुद्द श्रध्दानेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलताना श्रध्दा म्हणते, “ रेमो सर, प्रभुदेवा आणि वरुण धवन या सुपर एनर्जेटिक टीमसोबत एबीसीडी 2 नंतर पुन्हा एकदा काम करण्यास मी खुप उत्साहित आहे आणि हे सर्व फक्त निर्माते भूषण कुमार यांच्यामुळे शक्य झालं आहे. या सिनेमासाठी आम्हा सर्वांची प्रचंड मेहनत असणार आहे,पण आम्ही यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.”

रेमोच्या पत्नीसह या सिनेमाची निर्मिती करणारे भूषण कुमार म्हणतात, “हा डान्सवर आधारित 3 D सिनेमा भारतातील आत्तापर्यंत सर्वांत मोठा सिनेमा  असेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असू”

दिग्दर्शक आणि प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसूझा म्हणतो, “हा सिनेमा म्हणजे सर्व जुने मित्र पुन्हा एकत्र येत असल्यासारखं वाटतंय. त्यामुळे पुन्हा एकदा धमाकेदार सिनेमा द्यायला आम्ही सज्ज आहोत.”

Recommended

Loading...
Share