By  
on  

‘पिंक’च्या तमिळ रिमेकमध्ये विद्या बालन

‘पिंक’ 2016 साली प्रदर्शित झालेल्या तापसी पन्नू आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेल्या सिनेमाचा लवकरच तमिळ रिमेक बनणार आहे. ‘पिंक’ला समिक्षक आणि प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली होती. बरेच दिवस याचा तमिळ रिमेक बनणार अशा चर्चा होत्या. आता या सोशल-थ्रीलर तमिळ रिमेकमध्ये कोणी साऊथ अभिनेत्री नाही, तर आपल्या सशक्त अभिनयाने बॉलिवुड गाजवणारी चतुरस्त्र अभिनेत्री विदया बालन झळकणार असल्याचे वृत्त आहे.

‘पिंक’च्या या तमिळ रिमेकमध्ये बिग बी यांची भूमिका तमिळ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अजित साकारणार आहेत. तसंच सिनेमाचे निर्माते बोनी कपूर यांनीसुध्दा अभिनेता अजितसोबत या रिमेकमध्ये विद्या बालन झळकणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिड डे वृत्तपत्रासी बोलताना बोनी कपूर म्हणाले, “ अद्यापतरी या रिमेकमधील विद्याच्या भूमिकेबद्दल काहीच स्पष्ट सांगता येणार नाही. स्क्रिप्टमध्ये अनेक फेरबदल करुन विद्याच्यादृष्टीने भूमिका लिहण्यात येणार आहे.”

यापूर्वी बोनी कपूर म्हणाले होते, “2019 मध्ये हा ‘पिंक’चा हा तमिळ रिमेक प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

Recommended

PeepingMoon Exclusive