By  
on  

मनसेचा शिव ठाकरेला पाठिंबा, शेयर केली खास पोस्ट

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचलेला आपला मराठमोळा शिव ठाकरे हा या सीझनच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जातो. या शोमध्ये त्याने भल्याभल्यांना कॉंटे की टक्कर दिली. या सीझनमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली. आता ग्रॅण्ड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. शिवला महाराष्ट्रातून खूप पाठिंबा मिळताना दिसत आहे.

महेश मांजरेकर, नवनीत राणा यांनी सोशल मिडीयावर शिवला पाठिंबा दिल्यानंतर आता आता मनसेकडूनही शिव ठाकरेला पाठिंबा मिळाला आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक पोस्ट करत शिवला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी शिवला ग्रँड फिनालेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. “आमच्या सर्वांचा अभिमान, महाराष्ट्राची शान शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला आहे. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा”, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive