By  
on  

प्रेक्षकाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रणवीरने केली ही युक्ती, तोंडाला रुमाल बांधून पाहिला सिनेमा

रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील अतरंगी वल्ली आहे यावर कुणाचंही दुमत नसावं. प्रेस कॉन्फरन्समध्ये स्कर्ट घालून येणं, सिनेमाच्या प्रमोशनसाठी वरातीत नाचणं, सिनेमा हॉलच्या छतावर नाचणं अशा अनेक कारणांसाठी तो कायमच चर्चेत असतो. रणवीर आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.

त्याचा ‘सिंबा’ काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे.सिंबाने आतापर्यंत घवघवीत कमाई केली आहे. सिंबाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा वेळी शांत बसेल तो रणवीर कसला ! त्याला प्रेक्षकांची लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. मग काय, रणवीरने तोंडाला रुमाल बांधला, गॉगल घातला आणि थेट पोहोचला सिंबा बघायला. ही बाब समोर आल्यानंतर रणवीरच्या चाहत्यांना अत्यंत आनंद झाला. रणवीरदेखील चाहत्यांचं प्रेम पाहून भारावून गेला होता.

 

Recommended

PeepingMoon Exclusive