By  
on  

'तारे जमीन पर' फेम ज्येष्ठ अभिनेत्री ललिता लाजमी यांचं निधन

सुप्रसिध्द दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक गुरूदत्त यांच्या बहिणीचं म्हणजेच ललिता लामजी यांचं सोमवारी निधन झालं. त्या 90वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशननं दिली आहे. ललिता यांनी अमिर खानच्या तारे जमीन पर सिनेमात स्पेशल अपीयरेंस म्हणून काम केलं होतं.

ललिता लाजमी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर सिनेसृष्टीतील शोक व्यक्त करण्यात येत आहे. ललिता लाजमी या एक सेलिब्रेटी पेंटर होत्या. त्यांचा जन्म 1932साली कोलकत्ता येथे झाला.  गुरू दत्ता हे त्यांचे मोठे भाऊ होते. गुरू दत्ता देखील शास्त्रीय नृत्यप्रेमी होते. 

Recommended

PeepingMoon Exclusive