
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीसाठी पुन्हा एकदा एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय कॉमेडियनचे निधन झाले. कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश यांचे निधन झाले. त्या अवघ्या ४१ वर्षांच्या होत्या.
४१ वर्षीय सुबी यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या अशूी माहिती समोर येतेय. त्यांच्यावर कोची याठिकाणी एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान सुबी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर त्या स्टेज शोमध्ये कॉमेडी करू लागल्या.