शूटिंगदरम्यान बिग बी अमिताभ बच्चन जखमी; सध्या घेतायत सक्तीची विश्रांती

By  
on  

एखाद्या तरुण कलाकारालासुध्दा लाजवेल असा उत्साह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यात दिसून येतो. वयाची ७५ री ओलांडली तरी सिनेमा, जाहिराती यांच्या शूटींगमध्ये ते सतत व्यग्र असतात. त्यामुले आजच्या पिढीला त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. त्यांचे जगभर चाहते आहेत. त्यांचा चाहत्यांसाठी नुकतीच एक वाईट बातमी समोर आलीय.

 हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ जखमी झाले असून एक सीन शूट करत असताना ही घटना घडली. अमिताभ यांना दुखापत झाल्याने संबंधित सिनेमाचे शूटिंगही रद्द करण्यात आले. त्यांना उपचारानंतर मुंबईला परतण्याची परवानगी देण्यात आली.  बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांना दुखापत झाल्याची माहिती दिली. सध्या ते योग्य उपचार आणि आराम करत आहेत. सर्व गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या जात आहेत. 

 

बिग बी यांनी ब्लॉगमध्ये लिहलंय, 'या अपघातातून ठीक होण्यासाठी काही आठवडे जातील असं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. वेदनांसाठी काही औषधेही देण्यात आली आहेत. जोपर्यंत यातून बरे वाटत नाही तोपर्यंत सर्व कामं पुढे ढकलण्यात आली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत. मी सध्या जलसामध्ये आराम करतो आहे. आवश्यक गोष्टींसाठीच थोडीफार हालचाल करेन. अधिकतर वेळ मी आरामच करत आहे. संध्याकाळी जलसाच्या गेटवर माझ्या हितचिंतकांना भेटणे आज मला शक्य होणार नाही. त्यामुळे कृपया येऊ नका. त्यामुळे जे येण्याचा विचार करत आहेत, त्यांनाही कळवा. बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत.

Recommended

Loading...
Share