
बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
१९९६ मध्ये कौशिक यांच्या दोन वर्षाच्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. त्यांच्यामागे पत्नी व ११ वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे.
"Actor Satish Kaushik passes away," tweets Anupam Kher
Read @ANI Story | https://t.co/KkmyNu4D7L#SatishKaushik #AnupamKher #Bollywood pic.twitter.com/TpPhNcXSYV
— ANI Digital (@ani_digital) March 9, 2023
सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
मिस्टर इंडिया या अनिल कपूर श्रीदेवी अभिनीत सुपरहिट सिनेमातील सतीश कौशिक यांची कॅलेंडर ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली.