By  
on  

वडिलांच्या निधनानंतर सतिश कौशिक यांच्या लेकीने शेअर केला गोड फोटो

हिंदीतील  प्रसिध्द अभिनेते- दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरलीय. सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. नुकतंच सतीश यांच्या 10 वर्षांच्या मुलीने वंशिका हिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो थोडा जुना आहे. या फोटोत ती तिच्या वडिलांच्या गळ्यात हात टाकून बसली आहे. ते दोघेही आनंदात पाहायला मिळत आहे.

वंशिकाने हा फोटो शेअर करत त्याला काहीही कॅप्शन दिलेले नाही. तिने फक्त रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर अनेकजण सांत्वनपर कमेंट करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर तिने शेअर केलेले व्हिडीओ पाहून ती वडिलांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत आहे असं दिसत आहे. रिल्स व्हिडीओद्वारे ती उत्तम अभिनयही करताना दिसते. वंशिका तिच्या वडिलांप्रमाणेच अगदी हुशार आहे. शिवाय तिला कलाक्षेत्राची आवड असल्याचं व्हिडीओंमधून दिसून येतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive