By  
on  

दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका 'नुक्कड'चे खोपडी फेम अभिनेते समीर खाकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. पण ते ‘नुक्कड’ या दूरदर्शनवरील मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. या भूमिकेने ते घराघरांत पोहचले. समीर खक्कर तब्बल गेल्या ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते. ते सलमान खानच्या जय हो या सिनेमातही झळकले होते. 

समीर खक्कर हे गेल्या काही वर्षांपासून अमिरेकेत स्थायिक झाले होते. परंतु काही वर्षांनी ते पुन्हा भारतात आले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive