By  
on  

सामान्य व्यक्तीचा सुप्रसिद्ध रॅपर होण्यापर्यंतचा प्रवास: गली बॉयचा ट्रेलर रिलीज

हे वर्ष रणवीरसाठी धडाकेबाज ठरणार असं दिसतंय. कारण वर्षाखेरीस त्याचा सिंबा रिलीज झाला. सिंबाच्या यशाचा जश्न सरतो न सरतो तोच ‘गली बॉय’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीरच्या अदाकारीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

रणवीरने इतर सिनेमांप्रमाणेच या सिनेमासाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. रणवीर यात एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या व्यक्तिरेखेत आहे. असा मुलगा जो रॅपर व्हायची स्वप्न बघत असतात पण परिस्थिती मात्र त्याच्या विरोधात असते.

या सिनेमातील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती आलियाची. रणवीरची गर्लफ्रेंड असलेली आलिया त्याच्याबाबत पझेसिव्ह असल्याचं ट्रेलरमध्ये दिसून येतं. आलिया हिजाब वापरणारी मुलगी असली तरी स्वत:च्या अस्मितेबद्द्ल जागरुक असल्याचंही ट्रेलरध्ये पहायला मिळतं.

लहानश्या घरात राहून मोठी स्वप्न पाहणारे रणवीर आणि आलिया या ट्रेलरमध्ये भाव खाऊन जातात हेच खरं!

https://www.youtube.com/watch?v=JfbxcD6biOk

Recommended

PeepingMoon Exclusive