By  
on  

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर हॉरर कॉमेडी सिनेमात एकत्र?

अभिनेता विकी कौशल आणि भूमी पेडणेकर ही जोडी पहिल्यांदाच एका हॉरर कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असणार आहे. विशेष म्हणजे नवीन दिग्दर्शक भानू प्रताप सिंग या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसतील.
विकी या सिनेमाबद्द्ल बोलताना म्हणतो, ‘हा सिनेमा विनोदी आहेच, पण हसवत हसवत घाबरवणारही आहे. मला या सिनेमाबद्द्ल विचारलं तेव्हा मी लगेच होकार कळवला.’
विशेष म्हणजे या सिनेमात भूमी पेडणेकरचा छोटा पण परिणामकारक रोल आहे. भूमी या सिनेमाच्या शुटिंगनंतर तिच्या नंतरच्या ‘वुमनिया’ सिनेमाचं शुटिंग सुरु करेल.
अजून प्रॉडक्शन हाऊसकडून या सिनेमाबद्द्ल कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. तरी लवकरच या सिनेमाची घोषणा होईल असं सुत्रांकडून सांगितलं जात आहे.
विकी सध्या ’उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. तर भूमी तिच्या ‘सोनचिरिया’मध्ये व्यस्त आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive