Video : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह

By  
on  

प्रसिध्द भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. आकांशा दुबे असं या अभिनेत्रीचं नाव असून फक्त २५ वर्षांची होती. वाराणसी येथील एका हॉटेल रुममध्ये तिने गळफास लावत आत्महत्या केली. मनोरंजनविश्वाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. 

आकांक्षा दुबेला ‘भोजपुरी क्वीन’ या नावाने ओळखले जायचे. ती वाराणसीमध्ये एका चित्रपटाच्या शूटींगसाठी आली होती. यावेळी ती सोमेंद्र हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. आकांक्षाने रविवारी दुपारच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. 

आकांक्षा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. आकांक्षाने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केले होते. यावेळीचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती रडताना दिसत आहे. 

दरम्यान आकांक्षाच्या हत्येचा तपास सध्या सुरु आहे. 

Recommended

Loading...
Share