By  
on  

‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ हृतिक रोशनचा आज वाढदिवस, पहा कोणी कोणी दिल्या शुभेच्छा

पदार्पणातच लोकप्रियतेचं अत्युच्च शिखरावर विराजमान झालेल्या हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. त्याला लूक्समुळे ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ अशी पदवीही मिळाली आहे. हृतिक आज ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी हृतिकला अनेक स्टार्सनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पण हृतिकसाठी सगळ्यात खास आहेत, पत्नी सुझान खान हिने दिलेल्या शुभेच्छा. सुझानने सोशल मिडियावर शुभेच्छा देत म्हटलं आहे की, हृतिक अत्यंत चांगला माणूस आहे. तो कायमच माझ्यासोबत राहील यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/BsbFNAhF8dd/?utm_source=ig_web_copy_link

हृतिकला ‘कहो ना प्यार है’ या पदार्पणातील सिनेमातच यशाची अभूतपुर्व चव चाखायला मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

https://twitter.com/iamsonalibendre/status/1083248985756712960

वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यात अनेक चढ उतार येऊनही हृतिक आजही अनेकांसाठी ‘प्रिन्स चार्मिंग’ आहे. हृतिक सध्या विकास बहलच्या ‘सुपर ३०’च्या शुटिंगमधून रसिकांसमोर येईल. हृतिकला आज फराह खान, पुलकित सम्राट, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून हृतिकला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BscTrzmA0Kn/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive