By  
on  

‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘त्या’ चुका महागात पडणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' नंतरचा बिग बजेट सिनेमा 'आदिपुरुष' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनॉन , सनी सिंह आणि आपला मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकतोय. देवदत्त या सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रामनवमीच्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ‘आदिपुरुष’चे नवे पोस्टर प्रदर्शित केले. पण या पोस्टरमध्ये अनेक चुका नेटकरी आणि प्रेक्षकांना साफ दिसल्या. त्यामुळे आता त्या चुका या सिनेमाच्या दिग्दर्शक, कलाकारांना भोवणार असल्याचं दिसतंय. 

चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत, निर्माते भूषण कुमार आणि कलाकारांच्या नावे मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतःला सनातन धर्माचा प्रचारक म्हणवणारे संजय दीनानाथ तिवारी यांनी ही तक्रार केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Om Raut (@omraut)

 

‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्याने ‘रामचरितमानस’ या हिंदी धार्मिक पुस्तकातील पात्रांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘आदिपुरुष’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हिंदू धर्मीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ४३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्रिती सेनॉनच्या भांगात कुंकू नाही, त्यामुळे तिला अविवाहित स्त्री दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. तसंच असं करून ते सनातन धर्माचा अपमान करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive