By  
on  

हनुमान की जय! मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो साऊथ सुपरस्टारने केला शेयर

दिग्दर्शक ओम राऊत यांचा बिग बजेट  चित्रपट आदिपुरुष मधील भगवान हनुमान यांचं नवं पोस्टर समोर आलं आहे. आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर ते उलगडण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेता देवदत्त गजानन नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे. हुबेहुब हनमानासारखाच देवदत्तचा लुक झाला आहे. हे पोस्टर फारच लक्षवेधी आहे. अभिनेत्याचा हा लूक  सिनेमासाठीची उत्सुकता वाढवत आहे हे मात्र नक्की. 

'आदिपुरुष' चित्रपटात भगवान श्री रामची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासने हनुमान जयंतीनिमित्त चित्रपटातील 'हनुमान' म्हणजेच देवदत्तचा लूक शेअर केला. अभिनेत्याने नवीन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'रामाचा भक्त आणि रामकथेचा प्राण... जय पवनपुत्र हनुमान!'. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

मराठीचा छोटा पडदा गाजवणरा जय  मल्हार फेम देवदत्तने यापूर्वी ओम राऊतसोबत 'तान्हाजी' चित्रपटात काम केले आहे.दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास स्टारर या सिनेमात सैफ अली खान, क्रिती सेनॉन , सनी सिंह आणि आपला मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे झळकतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive