By  
on  

Video : अभिनेता इरफान खानचा शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांचे डोळे पाणावले !

अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या संपुर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती. इरफानच्या  जाण्याने कधीही भरुन न  निघणारी पोकळी निर्माण झालीय. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही इरफानने आपल्या अभिनयाने खास ओळख निर्माण केली होती. त्याचा अभिनय प्रवास थक्क करणारा ठरला. हिरो मटेरिअल न दिसतासुध्दा इरफानने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
 

मुंबईच्या कोकिलाबेन धिरूबाई अंबानी रुग्णालयात त्याने एप्रिल 2020 मध्ये अखेरचा श्वास घेतला व गेली दोन वर्ष त्याची सुरु असलेली कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. इरफानचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठ्या पडद्यावर पुन्हा या अभिनेत्याला पाहण्याची बऱ्याच लोकांची इच्छा पूर्ण होणार आहे.

‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ हा इरफानचा शेवटचा चित्रपट लवकरच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच याचा ट्रेलरही समोर आला आहे. इरफानचा मुलगा आणि अभिनेता बाबील खान याने याबद्दल माहिती दिली. हा ट्रेलर पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. एका उत्कृष्ट कलाकाराला पण गमावलं असलं तरी त्याच्या कलाकृतींनी मनात कायमच घर केलंय. त्याचा हा अखेरचा सिनोमासुध्दा ह्याला अपवाद नाही. 

 

 

 

इरफानचा हा ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ चित्रपट ६ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. आधी वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता हिंदीत येणार आहे, यामुळेच याला इरफानचा शेवटचा चित्रपट म्हंटलं जात आहे. या चित्रपटात इरफानसह गोलशिफतेह फराहानी, वहीदा रहमान आणि शशांक अरोरा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २८ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive