By  
on  

दीपिका पदुकोणने सुट्टीनंतर केली छ्पाकच्या शुटिंगला सुरुवात, लहानपणीचा फोटो केला शेअर

लग्नानंतरच्या मोठ्या सुट्टीनंतर दीपिका पुन्हा शुटिंगसाठी सज्ज झाली आहे. दीपिका आता मेघना गुलजारच्या ‘छपाक’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. खुद्द दीपिकनेच सोशल मिडियामार्फत ही बातमी शेअर केली आहे. या सोबतच तिने लहानपणीचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये पांढरा टीशर्ट आणि डंगरीसुट घातला आहे.

या गेट अपमध्ये लहानगी दीपिका खुपच क्युट दिसत आहे. ‘बॅक टू स्कूल’ असं कॅप्शन लिहिलेल्या या फोटोमध्ये हॅशटॅग छपाक असंही लिहिलं आहे.

https://www.instagram.com/p/Bsufs-aggnX/?utm_source=ig_web_copy_link

छ्पाक हा सिनेमा अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अगरवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. दीपिका या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत आहे. तिच्यासोबत या सिनेमात विक्रांत मेस्सी काम करत आहे. या सिनेमातून एक सामाजिक संदेश तर दिला जाईलच याशिवाय दुर्दम्य इच्छाशक्तीविषयीही हा सिनेमा भाष्य करेल.

Recommended

PeepingMoon Exclusive