‘पती पत्नी और वो’चा हा फोटो पाहिलात का?

By  
on  

आजकाल सिनेमा आणि गाण्यांचे रिमेक करण्याचा बॉलिवूडमध्ये जणू सपाटाच सुरु आहे. यातच आता आणखी एका गाजलेल्या सिनेमाच्या रिमेकची भर पडलीय हे तुम्हाला माहितच आहे. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ हा सिनेमा विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदी बाज होता. या कारणास्तव हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. या सिनेमामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

यापूर्वी पिपींगमून डॉट कॉमने एक्सक्ल्युझिव्हरित्या दिलेल्या माहितीनुसार अभिनेता कार्तिक आर्यन या सिनेमात संजीव कुमार यांनी साकारलेली प्रमुख भूमिका साकरतोय, हे आपण जाणतोच. आता ह्यातील अभिनेत्रींच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं आहे ते म्हणजे पडद्यावर कार्तिकसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर व नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे यांची केमिस्ट्री रंगणार आहे. कार्तिकसोबत कोणत्या अभिनेत्रींची वर्णी लागणार याबाबत बरीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. पण अखेर आता या दोन अभिनेत्रींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. भूमी आणि अनन्या या दोघींनीही आपल्या सोशल अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करत याची माहिती दिलीय.

https://www.instagram.com/p/BszSZMQH_DX/?utm_source=ig_embed

‘हॅपी भाग जायेगी’ फेम दिग्दर्शक मुदस्सर अझीज ह्या रिमेकची धुरा सांभाळत आहेत. निर्माते जुनो चोप्रा आणि अभय चोप्रा हे टी- सिरीजचे भूषण कुमार यांच्या सह्योगाने या रिमेकची निर्मिती करत आहेत.

 

https://www.instagram.com/p/BszSB4BB9ah/?utm_source=ig_embed

 

सर्वांनाच आता ‘पती,पत्नी और वो’च्या ह्या रिमेकची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Recommended

Loading...
Share