By  
on  

दिमाखात पार पडलं नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचा उद्घाटन सोहळा, पंतप्रधानांसहित जमली ता-यांची मांदियाळी

पंतप्रधानांनी नुकतंच नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचं उद्घाटन केलं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक तारे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा उद्घाटन समारंभ मुंबईमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला.

यावेळी अभिनेता मनोज कुमार, आमिर खान, कंगना राणावत, करण जौहर, रोहित शेट्टी, पुनम ढिल्लन, कपिल शर्मा यांच्यासारखे बरेच सेलिब्रिटी हजर होते.

https://www.instagram.com/p/Bs0s35HgpSe/?utm_source=ig_web_copy_link

मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘उरी’ सिनेमाच्या ‘हाउज द जोश’ या वाक्याने केली. त्यावर उपस्थितांनीही त्यांना दाद दिली. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी मोदींसोबत सेल्फी घेतला. कपिल शर्माने एक फोटो इन्स्टावर पोस्ट केला आणि पंतप्रधानांच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक केलं. यावेळी आशा भोसले, कर्तिक आर्यन, जितेंद्र हे देखील उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/Bs0xVG1Dsn3/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive