By  
on  

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने ओलांडला शंभर कोटींचा गल्ला

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला मिळणा-या प्रेक्षकांची मिळणारी दिवसागणिक पसंती वाढतच चालली असून नुकताच या सिनेमाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम यांच्या अभिनयाने सजलेला हा जाज्वल्य देशभक्ती जागवणारा सिनेमाचे प्रेक्षकांसह समिक्षकांनीही प्रचंड कौतुक केले.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे याविषयीची माहिती दिली. ''उरी....'ने फक्त शंभर कोटींच्या कमाईचा आकडाच ओलांडला नाही, तर 2019 या वर्षातील तो पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे'', असं त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं.

 

https://twitter.com/taran_adarsh/status/1086887670142230528

 

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’,अशा दमदार संवादामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरला आहे. जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून दोन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ‘उरी’ सिनेमा उलगडतो.

 

https://youtu.be/Cg8sbRFS3zU

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमाच्या बजेटची वसुलीतर या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात केली त्यानंतर या सिनेमाची लोकप्रियता आणि विकी कौशलने साकारलेली सैन्यदल अधिका-याची भूमिका याची पसंती वाढतच गेली.

Recommended

PeepingMoon Exclusive