By  
on  

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा एकत्र दिसणार या सिनेमात, या दिवशी रिलीज होणार सिनेमा

एकीकडे नवाजुद्दीनच्या ठाकरे या बायोपिकची चर्चा असतानाच त्याचा दुसरा सिनेमाही येऊ घातला आहे. नवाजुद्दीनचा ‘फोटोग्राफ’ हा सिनेमा रिलीजसाठी तयार झाला आहे. हा सिनेमा ८ मार्च म्हणजेच वुमन्स डे दिवशी रिलीज होत आहे.
‘लंचबॉक्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक रितेश बत्रा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात नवाजसोबत सान्या मल्होत्रा झळकणार आहे. रितेश बात्रा यांनी या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. यात नवाज आणि सान्या पाठमोरे आहेत. नवाजच्या खांद्यावर सॅक आहे आणि सान्याने बॅग कॅरी केली आहे.

https://twitter.com/riteshbatra/status/1087518815368372224

नवाजचा रितेश यांच्यासोबत हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्यांनी लंच बॉक्समध्येही काम केलं होतं. विशेष सुत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा सनडान्स फिल्म फेस्टीव्हल तसेच बर्लिन फिल्म फेस्टीव्हल मध्येही दाखवला जाणार आहे.
या सिनेमाची पार्श्वभूमी मुंबईमधील धारावी इथली आहे. सान्या एक अंतर्मुख कॉलेजगर्लच्या व्यक्तिरेखेत आहे. सान्याचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी सान्या आयुष्मान खुरानासोबत बधाई होमध्ये दिसली होती.

https://twitter.com/Nawazuddin_S/status/1086158805510037504

Recommended

PeepingMoon Exclusive