By  
on  

नावाचा आणि देशाचा अभिमान बाळगण्यास शिकवणार सलमान खानचा ‘भारत’, टीझर रिलीज

सलमानला २०१८ म्हणावं तसं बरं गेलं नाही. त्याच्या रेस ३ ने दणकून आपटी खाल्ली. या सिनेमाची सोशल मिडियावर देखील खिल्ली उडवली गेली. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना त्याच्या दमदार आगमनाची प्रतिक्षा होती.

ही प्रतिक्षा आता संपली आहे. सलमानच्या आगामी भारत सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या टीजरमधून सलमाने पुन्हा एकदा दमदार एंट्री घेतली आहे. भारत हे नाव असलेल्या युवकाची ही गोष्ट आहे. सलामान या टीजरमध्ये नेव्ही ऑफिसरच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. या लूकमध्ये तो खुपच रुबाबदार दिसत आहे. अतुल अग्निहोत्री या सिनेमाचे निर्माते आहेत. २०१९च्या ईददिवशी सलमानचा भारत रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रोव्हर, दिशा पाटनी यांच्या भूमिका आहेत.

टीजरमध्ये सलमान भारत या नावामागची गोष्ट सांगताना दिसत आहे. सलमान या सिनेमामध्येही अ‍ॅक्शनची धमाल असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्याही या सिनेमाकडून अपेक्षा वाढतील यात शंका नाही.

https://youtu.be/Fxq18WuuRms

Recommended

PeepingMoon Exclusive