प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्षयकुमारने चाहत्यांना दिलं हे खास गिफ्ट , ट्वीट करून दिल्या शुभेच्छा

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार नेहमीपेक्षा काही तरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. यावर्षी अक्षयकुमार त्याच्या सगळ्यात मोठ्या सिनेमात रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा आहे केसरी. हा सिनेमा शिखांच्या सारागढ़ी येथील लढाईवर बेतलेला आहे. या सिनेमात परिणीती चोप्राही अक्षयसोबत झळकणार आहे. अक्षय या सिनेमात हवालदार ईशरसिंगची व्यक्तिरेखा साकारत आहे. ईशरसिंग यांनी २१ शीख सैनिकांनासोबत घेऊन हजारो अफगाणी आक्रमणकर्त्यांना सळो कि पळो करून सोडलं होतं.

https://www.instagram.com/p/BtF4iw9HYAi/?utm_source=ig_web_copy_link

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून केसरीच्या निर्मात्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षय सर्व शीख सैनिकांसोबत दिसत आहे. या सगळ्या सैनिकांमध्ये अक्षय त्याच्या केशरी रंगाच्या पगडीमुळे उठून दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना निर्माता अपूर्व मेहता म्हणतात, ‘प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. हा ७० वा प्रजासत्ताक दिवस असला तरी लोक खुप मोठ्या काळापासून देशासाठी लढत आहेत. १२२ वर्षांपूर्वी २१ शिखांनी दहा हजार अफगाणी आक्रमकांना नमवलं होतं. केसरी ही त्यांची गोष्ट आहे. हा सिनेमा २१ मार्च २०२१मध्ये रिलीज होत आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1089084966309453824

Recommended

Loading...
Share