By  
on  

या कार्यक्रमात एकत्र आले अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग

नुकताच उमंग २०१९ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग हे एकाच फ्रेममध्ये आले होते. अक्षय कुमारने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हे चौघजण धमाल करताना दिसत आहेत. हे चौघे पहिल्यांदाच एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत.

अक्षय कुमार आणि अजय देवगण पहिल्यांदाच रोहीत शेट्टी दिग्दर्शित सिंबामध्ये कॅमिओ करताना दिसले होते. यात रणवीर सिंग आणि सारा अलीखान यांची मुख्य भूमिका होती. सिंबाने रेकॉर्ड्ब्रेक कमाई करत यशाचे मापदंड ओलांडले.

रोहीत आगामी काळात अक्षय कुमारला घेऊन सुर्यवंशी सिनेमा बनवणार आहे. हा देखील रोहीतच्या इतर सिनेमांप्रमाणे पोलिसपट असणार आहे. हा सिनेमादेखील रोहीतच्या इतर सिनेमांप्रमाणेच यश मिळवेल अशी आशा त्याचे चाहते करत आहेत. रोहित बॉलिवूडचा पहिला असा दिग्दर्शक आहे ज्याचे सलग आठ सिनेमे १०० कोटी कलेक्शन करणारे सिनेमे बनले आहेत.

https://www.instagram.com/p/BtJVGvnnjrC/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive