By  
on  

21 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी दीपिका पादुकोणची निवड

दीपिका पादुकोणच्या अभिनयाचं नेहमीच सर्वत्र कौतुक केलं जातं. ओम शांती ओम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक सिनेमाद्वारे ती आपली छाप सोडते.तिचा लास्ट रिलीज सिनेमा पदमावतद्वारे तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.आता ती छप्पाक सिनेमाद्वारे ब-याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पण आता तिच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडलीय.

नुकत्याच आलेल्या मिडीया रिपोर्ट्सनुसार दीपिका पादुकोणची 21 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी आमिरची पत्नी किरण राव हे अध्यक्षपद भूषवत होती. पण सिनेमांच्या प्रोजेक्ट्समुळे तिने हे पद सोडलं.

या निवडीबद्दल मुंबई मिरररने  जेव्हा दीपिकाला विचारलं तेव्हा ती म्हणते, "हे काम खुप जबाबदारीचं आहे. जेव्हा मला ते सोपवण्यात आलं तेव्हा मला खुप अभिमान वाटला. मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हलने जेव्हा माझ्यासोबत या अध्यक्षपदासंदर्भात चर्चा केली तेव्हा मला फार आनंद झाला."

https://www.instagram.com/p/BssjgamAaSk/

 

दीपिकाला या मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या व्हिजनवर पूर्ण विश्वास आहे. सिनेइंडस्ट्रीचा जास्तीत जास्त विस्तार आणि विकास व्हावा अशी दीपिकाची इच्छा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive