By  
on  

पोलिसपटांचा राजा रोहित शेट्टीचा असाही दिलदारपणा, सिंबाच्या कमाईतील ५१ लाख मुंबई पोलिसांना

रोहित शेट्टीला नवीन वर्षं चांगलंच लाभदायक ठरलं आहे. त्याच्या सिंबाने वर्षाच्या सुरुवातीलाच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे रोहीत सध्या खुषीत आहेत. सलग आठ हिट सिनेमे देणारा तो बॉलिवूडमधील पहिलाच दिग्दर्शक बनला आहे.

अलीकडेच रोहीतने उमंग २०१८ या पोलिस कल्चरल प्रोग्रॅममध्ये हजेरी लावली होती. यावेळी रोहितने केलेल्या कामामुळे त्याची सर्वत्र वाहवा होत आहे. या कार्यक्रमात रोहितचे ‘रील पोलिस’ म्हणजेच अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग हे देखील हजर होते. यावेळी रोहितने रोहित शेट्टी पिक्चर्सकडून मुंबई पोलिसांना  ५१ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. पोलिसांच्या वतीने पोलिस आयुक्तांनी स्वीकारला.

रोहितच्या सिंबाने पाच आठवड्यांमध्ये २३९ कोटींची कमाई केली होती. या वर्षी रोहित शेट्टी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणारा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमामध्ये अक्षय एटीएस प्रमुखांच्या भूमिकेमध्ये दिसेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘उमंग २०१९’ हा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. दिवस-ऱात्र मुंबईसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मनोरंजनासाठी अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनीही रोहीतने जुहु पोलिस स्टेशनमध्ये जाऊन झेंडावंदन केलं होतं.

https://www.instagram.com/p/BtKivvlg2zC/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive