By  
on  

ऐश्वर्याने पती अभिषेकला या खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन ही बॉलिवूडमधील एक परफेक्ट रिअल लाईफ जोडी म्हणून सर्वज्ञात आहे. आज अभिषेकचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने त्याची पत्नी ऐश्वर्याने त्याला एका हटके आणि रोमॅण्टीक पध्दतीने सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याची अभिषेकसाठीची ही खास पोस्ट पाहून तुम्हीसुध्दा नक्की म्हणाल, वा क्या बात है, पत्नी असावी तर अशी.

आज अभिषेकच्या वाढदिवशी ऐश्वर्याने अभिषेकचा बालपणीचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या रोमॅण्टीक शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणाली, ठ तु माझा बेबी आहेस. तुला वाढदिवसाच्या खुप सा-या शुभेच्छा आणि तु नेहमीच माझा बेबी राहशील." अभिषेकचा हा फोटो आणि ऐश्वर्याची ही पोस्ट खुपच क्यूट आहे.

https://www.instagram.com/p/BteKmL2HhFW/?utm_source=ig_embed

 

दरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या ही रिअल लाईफ जोडी आगामी गुलाबजामून या सिनेमात ऑनस्क्रीन झळकणार होती. पण काही अडचणींमुळे ही जोडी या सिनेमात एकत्र येणार का नाही, यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

तसंच मिडीया रिपोर्ट्सनुसार काही दिवसांपूर्वीच अभिषेकने आपल्या 2019च्या प्लान्सबद्दल स्पष्ट करताना, आपण आता सहाय्यक भूमिका करणार नसल्याचं म्हटलं होतं. तसंच कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनमध्ये तो असंही म्हणाला मी इंडस्ट्रीत अनेक बिग बजेट सिनेमात मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. पण आता मी सिनेमांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे. मी या इंडस्ट्रीत कोणाच्या पाठीमागे उभं राहायला आलेलो नाही,असंही म्हणाला.

Recommended

PeepingMoon Exclusive