'पती पत्नी और वो' सिनेमात असा आहे, कार्तिक आर्यनचा लूक

By  
on  

बॉलिवूडमध्ये सध्य सिनेमांचा रिमेक करण्याचा ट्रेंड आलाय. जुन्या सिनेमाला नवीन कलाकारांच्या फोडणीसह प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा कल वाढला आहे. 1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ हा सिनेमा विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदी बाज होता. या कारणास्तव हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. याचा लवकरच रिमेक येतोय आणि यात नव्या फळीतील कलाकार कार्तिक आर्यन हा अभिनेता संजीव कुमार यांनी साकारलेली प्रमुख भूमिका साकारतोय. या सिनेमातील कार्तिकचा फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे.

‘पती,पत्नी और वो’ या सिनेमाच्या रिमेकमधील लूक खुद्द कार्तिकनेच सोशल मिडीयावर शेअर केला आहे आणि एक धम्माल कॅप्शन पण लिहलंय,"भेटा, लखनऊच्या चिंटू त्यागी यांना".  सिनेमात कार्तिक आणि अभिनेत्री अनन्या पांडे एकत्र झळकणार आहेत. तसंच या दोघांसोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकरसुध्दा स्क्रीन शेअर करतेय.  विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कार्तिक आणि अनन्या यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर पकडला होता.

या रिमेकचे निर्माते भूषण कुमार म्हणतात, "कार्तिक आर्यनचा सिनेमातील हा लूक सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. त्याच्या ह्या लूकबद्दल आम्ही सेटवरसुध्दा प्रचंड उत्सुक होतो. त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ही त्याची वेगळी भूमिका ठरणार आहे. सर्वांनाच हा लूक नक्की आवडेल."

https://www.instagram.com/p/BtfBznkBxjL/?utm_source=ig_embed

१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केलं होतं. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या रिमेकचं दिग्दर्शन मुद्दसर अझीझ करतोय.

Recommended

Loading...
Share