By  
on  

या ग्लॅमरस अवतारात ‘मुंगडा’वर थिरकली सोनाक्षी सिन्हा

'टोटल धमाल' सिनेमाचं आणखी एक धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘मुंगडा’या अभिनेत्री हेलन यांच्या गाण्याला रिक्रिएट करण्यात आलं आहे. बॉलिवूडची दबंग गर्ल ग्लॅमरस अवतारात या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतेय. स्विमिंग पूलमधील सोनाक्षी सिन्हाच्या घायाळ करणा-या अदांसह या गाण्याची जबरदस्त सुरुवात होते.

‘मुंगडा’च्या या रिक्रिएट व्हर्जनमध्ये सोनाक्षी सोबत एका स्टेपवर अजय देवगणसुध्दा थिरकतानाची झलक पाहायला मिळते. 70 च्या दसखातील इन्कार सिनेमातील‘मुंगडा’ या गाण्यावर अभिनेत्री हेलन हातात मद्याची बाटली घेऊन थिरकली होती आणि सर्वांवरच तिची नशा.आता या रिमेक गाण्यात सोनाक्षी आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना भुरळ पाडते आहे.

https://youtu.be/iD63CfkizWM

 

टोटल धम्मालचं मुंगडा हे या वर्षातलं दुसरं रिक्रिएट गाणं ठरलं आहे. यापूर्वी लुका छुपी सिनेमात अक्षय कुमारच्या 'ये खबर छपवा दो अखबार में'चं रिक्रिएट गाणं करण्यात आलं.

Recommended

PeepingMoon Exclusive