By  
on  

अशी साजरी झाली ‘उरी’ची सक्सेस पार्टी, कलाकारांनी दाखवला जोश

‘उरी’ सिनेमाने वर्षाची सुरुवात धमाकेदार यशाने केली आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून कमाईचे नव-नवीन विक्रम करताना दिसून येत आहे. या सिनेमाची सक्सेस पार्टी नुकतीच साजरी केली. या पार्टीत निर्माता रॉनी स्क्रुवाला, विकी कौशल, यामी गौतम, मोहित रैना आणि किर्ती कुल्हारी हे कलाकार उपस्थित होते.

या सिनेमाने इतर सिनेमांसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. २०१९ चा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून उरीचं नाव घेतलं जातं. या सिनेमाचं रसिकांनी आणि समीक्षकांनीही कौतुक केलं आहे.

२०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारलेली आहे. अभिनेता विकी कौशलचा हा पहिलाच अ‍ॅक्शन सिनेमा आहे. विकीसोबत या सिनेमात मोहित रैना, परेश रावल, यामी गौतम आणि किर्ती कुल्हारी यांसारखे कलाकार आहेत. आरएसवीपी मुव्हीजने सादर केलेला सिनेमा आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive