By  
on  

अतिउत्साही रणवीरचा चाहत्यांसमोर माफीनामा, सोशल मिडियावर मागितली माफी

रणवीर सिंगला ‘एनर्जी बॉय’ म्हटलं जातं. रणवीरमध्ये सतत उत्साह ओसंडून वहात असतो. पण अनेकदा उत्साहाच्या भरात त्याच्याकडून नकळत चुका होतात. असाच काहीसा प्रकार अलीकडेच घडला.
‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅप सॉन्ग गात असताना रणवीरने अचानक चाहत्यांमध्ये सूर मारला. पण त्याच्या या कृतीचा काहीच अंदाज चाहत्यांना आला नाही. त्यामुळे तो अनेक बेसावध चाहत्यांच्या अंगावर पडला. काहींना दुखापतही झाली. या प्रकारानंतर रणवीरला नेटिझन्सनी चांगलंच ट्रोल केलं आहे. सोशल मिडियावर ट्रोल झाल्यानंतर रणवीरने चाहत्यांची माफी मागितली आहे. फॅनक्लबच्या ट्वीटला उत्तर देताना रणवीर म्हणतो, ‘यापुढे मी काळजीपुर्वक वागेन. तुमच्या प्रेमासाठी खुप धन्यवाद.’
रणवीरच्या या प्रकरणामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल केलच पण सल्लेही दिले. ‘आतातरी बालिशपणा कमी कर’, ‘थोडा मोठा हो’ अशा कमेंट्स अनेक युजर्सही केल्या. अनेकांनी त्याच्यावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा प्रकार करत असल्याचा आरोपही ही केला आहे.

https://twitter.com/zara008/status/1092737918622416903

Recommended

PeepingMoon Exclusive