By  
on  

रोहीत शेट्टीचा आगामी सिनेमा फराह खान करणार दिग्दर्शित

‘गोलमाल’ आणि ‘सिंबाच्या’ सुपर सक्सेसनंतर अ‍ॅक्शन सिनेमांचा किंग रोहीत शेट्टीचा पुढील सिनेमा देखील अ‍ॅक्शनपॅक्ड असणार यात शंका नाही. पण या सिनेमाला कॉमेडीचाही तडका असणार आहे. विशेष म्हणजे  रोहीतच्या या सिनेमाचं दिग्दर्शन नाही करणार तर फराह खान करणार आहे. रोहीत शेट्टीच्या प्रॉडक्शन हाऊस खाली बनत असलेल्या या सिनेमाचं दिग्ददर्शन फराह करणार आहे.

रोहीतसोबत काम करण्याबाबत फराह म्हणते, कधी नशीब तुम्हाला इतकं काही देतं ज्यावर तुमचा विश्वास बसणं कठीण असतं. रोहीत माझ्या भावासारखा आहे. त्याच्या कामाचं मला नेहमीच कौतुक असतं. आता त्याच्यासोबत काम करायला मी उत्सुक आहे.’

https://www.instagram.com/p/BtkM29yhiMO/?utm_source=ig_web_copy_link

रोहीत म्हणतो, फराह आमच्यासोबत काम करणार ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगलाच असेल यात शंका नाही. रोहीतचा सिनेमा म्ह्टलं की तो ब्लॉकबस्टर ठरणार हे जणू समीकरणच बनलं आहे. रोहीत आता लहाना मुलांसाठी लिटील सिंघम नावाची अ‍ॅनिमेटेड स्टोरीही आणणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive