By  
on  

कॉफी विथ करणमध्ये या उत्तरासाठी अजय देवगणने जिंकली ऑडी कार

यंदा करण जोहरचा सर्वात चर्चित शो कॉफी विथ करणचा 6 वा सीझन विविध कारणांनी प्रचंड गाजला. अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या को-स्टार जोड्यांसोबत या चॅट शोमध्ये हजेरी लावली आणि करणच्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरं दिली. करणच्या या शोमध्ये रॅपिड फायर राऊंडला दर सीझनला बेस्ट उत्तर देणाा-याला Answer Of The Season म्हणून बक्षिस मिळतं आणि हे बक्षिस म्हणून ऑडी कार भेट मिळणार आहे.

अजयने कॉफीच्या 6 व्या सीझनमध्ये पत्नी काजोलसह हजेरी लावली होती. तेव्हा अजयला करणने प्रश्न विचारला होता तुझा आत्तापर्यंतचा सर्वातमोठा अंधविश्वास कोणता होता. मग अजय उत्तरला," मला वाटायचं की करणचे 'क' वरुन सुरु होणारे सर्व सिनेमे सुपरहिट होतात. पण जेव्हा काल प्रदर्शित झाला आणि गैरसमज दूर झाला." अजयचं हे उत्तर ऐकून काजोल म्हणाली होती की, अजय आत्ता ऑडी जिंकूनच राहणार.

https://www.instagram.com/p/BqMjCULgUIb/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive