By  
on  

'मुंगडा' गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जन पाहून लता मंगेशकरांचा संताप

बॉलिवूडमध्ये सध्या नवीन गाण्यांपेक्षा जुन्या गाण्यालाच जरासा नवीन संगीताचा तडका देऊन तो प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा सध्या कल वाढला आहे. जणू काही या रिक्रिएटेड व्हर्जन गाण्यांचा ट्रेंडच सेट झाला आहे. काही दिवसांपूर्वीच उषा मंगेशकर यांनी गायलेलं आणि हेलनच्या बहारदार नृत्यावर चित्रीत झालेलं गाणं आगामी टोटल धमाल सिनेमात रिक्रिएट करण्यात आलं आहे. हे व्हर्जन सोनाक्षी सिन्हावर चित्रीत झालं आहे. पण हे गाणं पाहून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर मात्र चांगल्याच संतापल्या आहेत.

लता मंगेशकर यांनी या गाण्याबद्दल आपलं परखड मत व्यक्त करत म्हटलं, "जुन्या गाण्यांना रिक्रिएट करणं ही अजिबातच योग्य पध्दत नाही. आमच्यावेळी गाणी फार काळजीपूर्वक तयार करण्यात यायची. त्यांच्यासोबत अजिबात छेडछाड करण्यास मनाई होती. जुन्या गाण्यांना अशाप्रकारे सादर करणं चुकीचं आहे. तसंच यासाठी कोणतीही परवानगीसुध्दा घेण्यात आलेली नाही." यापूर्वी  'मित्रो' सिनेनात त्यांच्या 'चलते चलते' गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन तयार करण्यात आले होते. तेव्हाही लतादीदींनी ही खंत व्यक्त केली होती.

दरम्यान, अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दिक्षित, रितेश देशमुख, जावेद जाफरी अशी तगडी आणि भली मोठी स्टारकास्ट असलेला टोटल धमाल हा सिनेमा येत्या 22 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive