By  
on  

हार्वर्ड विद्यापीठाकडून तनुश्री दत्ताला खास आमंत्रण

बॉलिवूडमध्ये मी टू नावाचं वादळ वणव्यासारखं पसरवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता अचानक प्रकाशझोतात आली. 2008 साली हॉर्न ओके सिनेमाच्या शूटींगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तवणुक केल्याचा आरोप केला. त्यावरुन बराच वादंग उठला. त्यानंतर जणू काही इंडस्ट्रीत महिला कलाकार पुढे येऊन आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तवणुकीबद्दल त्यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आवाज उठवला.

मी टू वादळ शमल्यानंतर तनुश्री पुन्हा अमेरिकाला निघून गेली. आता तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास बोलावणं आलं आहे. या महिन्यात पार पडणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणाण्यासाठी तिला निमंत्रण मिळालं आहे. तनुश्रीनं स्वत: याबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली.  या परिषदेत मी टु मोहीम, एकूणच बॉलिवूडचा अनुभव, तिचा आतापर्यंतचा प्रवास, स्त्रीयांवर होणारे अत्याचार यांसारख्या विषयांवर तनुश्री आपलं मनोगत व्यक्त करणार आहे.

https://www.instagram.com/p/BtoxYHbljWV/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive