Exclusive: फोटोशूटने रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा श्रीगणेशा

By  
on  

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी हे पहिल्यांदाच आगामी सिनेमाच्या प्रोजेक्ट निमित्ताने एकत्र येत आहेत. दोघांचाही ‘सूर्यवंशी’ हा पहिलाच सिनेमा. सिनेमाच्या  फोटो आज या जोडीने श्रीगणेशा केला. अजय देवगणचा सिंघम आणि रणवीर सिंहचा सिंबा या दोन या तुफान ब्लॉकब्लस्टर पोलिसपटांनंतर रोहित आता बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ हा पोलिसपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय.

अक्षय आणि रोहित या दोन सुपरस्टार जोडीच्या नव्या समीकरणानं यशराज स्टुडिओजमध्ये आपल्या महत्त्वकांक्षी सिनेमा ‘सूर्यवंशी’साठी फोटो शूट केलं. एखाद्या चांगल्या प्रोजेक्टसाठी वेळ दवडणं रोहित किंवा अक्षय यापैकी कोणालाच पसंत नाही.

पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी गोव्याहून परतल्यावर लगेचच या फोटशूटसाठी हजर होता. तुम्हाला वाटलं असेल सिंबाच्या जबरदस्त यशानंतर रोहित गोव्यात मस्त सुट्टी एन्जॉय करत असेल पण असं अजिबातच नाही. तो गोव्याला ‘सूर्यवंशी’च्या स्क्रीप्टवर काम करण्यासाठी गेला होता.

तर अक्षयबद्दल बोलायचं झालं तर यंदा त्याचे पाच सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत आणि त्याने त्यादृष्टीने पावलंसुध्दा उचलली आहेत. तो आपल्या वेळेचं योग्य नियोजन करतोय. करिना कपूरसोबत गुड न्यूज, परिणीती चोप्रासोबत केसरी आणि रितेश देशमुख, क्रिती सॅनन, बॉबी देओल, चंकी पांडे, राणा डुगुबत्ती यांच्यासोबत मल्टिस्टारर सिनेमा हाऊसफुल 4 आणि मिशन मंगल हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

सर्वांनाच आता रोहित आणि अक्षयच्या या पोलिसपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

 

Recommended

Loading...
Share