अशी आहे ‘उरी’ बॉय विकी कौशलची लव्हस्टोरी, ही अभिनेत्री आहे विकीची गर्लफ्रेंड

By  
on  

‘मसान’मधील साध्यासुध्या मुलापासूनची ते उरीमधील धाडसी जवानापर्यंत विकी कौशलची प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांनी डोक्यावर घेतली आहे. आजच्या घडीला विकीचं फिमेल फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. पण विकीची नजर मात्र वेगळीकडेच आहे. रिअल लाईफमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणा-या विकीची रिअल लाईफ ‘लेडी लव्ह’ आहे हरलीन सेठी.

विकीने अलीकडेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला. हरलीन एक  टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रिय टीव्ही होस्ट आहे.

https://www.instagram.com/p/BsuaSGthXME/?utm_source=ig_web_copy_link

या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली हा किस्सा विकीने अलीकडेच शेअर केला. विकी आणि हरलीन यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. तिला पाहताचक्षणी प्रेमात पडल्याचंही यावेळी विकीने कबूल केलं. त्यामुळे विकीच्या मनात पहिल्यापासूनच या नात्याबद्दल स्पष्टता होती. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली. या माध्यमातून एकमेकांना अधिक समजून घेता आलं. नात्यात एकमेकांना जाणून घेण्याचा अनुभव खुप खास असल्याचं तो सांगतो. ‘आम्ही एकमेकांसोबत अधिक कम्फर्टेबल असून एकमेकांशी कोणताही आडपडदा न ठेवता बोलू शकतो.’ हरलीन आणि विकी वर्षभर एकमेकांना डेट करत आहेत. उरीचं यश साजरं करताना विकी आणि हरलीनचा एक फोटोही व्हायरल झाला होता. विकी सध्या उरीच्या यशाचा आनंद घेत आहे त्यानंतर करण जोहरच्या तख्तमध्ये दिसणार आहे. तसेच त्यानंतर तो एका हॉरर सिनेमात दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share