By  
on  

रणवीर दीपिकाशी शेअर करतो ही बाब, दीपिकाने चाहत्यांना सांगितलं गुपित

दीपिका आणि रणवीर बी टाऊनमधील लाईमलाईटमध्ये असणारे जोडपं आहे. ब-याच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने मागील वर्षी लग्नगाठ बांधली. परफेक्शनिस्ट दीपिका आणि अतरंगी रणवीर यांचा संसार कसा सुरु असेल याची उत्सुकता या दोघांच्या चाहत्यांना नेहमी असते. चाहत्यांची उत्सुकता कमी करण्यासाठी दीपिकाने एक सिक्रेट शेअर केलं आहे. रणवीर त्याच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेचा विषय ठरत असतो. आता लग्नानंतरही दीपिकाही रणवीरची ड्रेसिंग स्टाईल कॉपी करते की काय अशी भिती तिच्या चाहत्यांना नेहमीच असते. पण याबाबतीत दीपिकाने एक खुलासा केला आहे.

 

रणवीरचा वॉर्डरोब इतका अतरंगी आहे की खुद्द दीपिकाही कधी कधी त्याच्याकडून स्वेटशर्ट किंवा टीशर्टची उधारी करते. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने रणवीरचा वॉर्डरोब शेअर करत असल्याची बाब सांगितली आहे. रणवीरचं स्वेटशर्ट आणि टीशर्टचं कलेक्शन उत्तम आहे. त्यामुळे त्याच्याकडून हे कपडे उधार घेत असल्याचं दीपिकाने स्पष्ट केलं.

रणवीर दीपिकाचे सनग्लासेस वापरत असल्याचंही तिने सांगितलं आहे. रणवीरचा हा अतरंगी ड्रेससेन्स आपल्यालाही अनेकदा खटकत असल्याचं तिने सांगितलं आहे. पण रणवीर मात्र दिलखुलासपणे आपला फॅशन सेन्स जाहीर करत असतो. अलीकडेच त्याने पांढरी फर असलेला ड्रेस घातलेला फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोवरून त्याला नेटक-यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं.

 

Recommended

PeepingMoon Exclusive