By  
on  

बॉलिवूड क्वीन कंगना बनवणार स्वत: वर बायोपिक, दिग्दर्शनाची धुराही सांभाळणार

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतचे तारे सध्या जोरावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कंगनाने दिग्दर्शित केलेला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाने यशाचे विक्रम मोडले आहेत. या यशाने कंगनाची पाचही बोटं तुपात आहेत. पण इतक्यात समाधान मानेल ती कंगना कसली ! तिने आता आणखी एक बायोपिक साकारायचं ठरवलेलं आहे. पण हा बायोपिक दुस-या तिस-या कुणाचा नसून स्वत:चा आहे. विशेष म्हणजे या बायोपिकचं दिग्दर्शनही कंगना करणार आहे.

https://www.instagram.com/p/Btf6geGHU3P/?utm_source=ig_web_copy_link

कंगनाचा हिमाचलमधील छोट्या गावापासून ते बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री असा प्रवास यात दिसेलच. बॉलिवूडमध्ये कोणताही पाठींबा नसताना स्वत:ची जागा निर्माण करण्याचा संघर्ष या बायोपिकमध्ये दिसून येईल. सध्या कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात बिझी आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट हातावेगळे झाल्यानंतर कंगना बायोपिकचा प्रोजेक्ट हातात घेईल. माझा पुढचा डायरेक्टोरिअल प्रोजेक्ट माझ्या स्वत:च्या आयुष्यावर बेतलेला आहे. पण हा स्वत:ला मोठे करण्याचा प्रयत्न नसून, माझा अख्खा प्रवास मी त्यातून दाखवू इच्छिते. माझ्या आयुष्यातील चढऊतार या चित्रपटात दिसतील. माझ्या अवतीभवती अनेक लोक आहेत, जे माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करतात. मला जज न करता, मला सोबत करतात, असे कंगना म्हणाली.

https://www.instagram.com/p/BtaPnt9nyok/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive