By  
on  

लवकरच सुरु होतंय राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'चं शुटींग

अभिनेत्री राणी मुखर्जीने 'मर्दानी' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. या सिनेमात तिने एका तडफदार पोलिस ऑफीसरची भूमिका साकारली होती. आता लवकरच या सिनेमाचा सिक्वल येतोय. या सिक्वलच्या प्री-प्रोडक्शनचं सर्व काम नुकतंच पूर्ण झालं आहे आणि मिडीया रिपोर्ट्सनुसार पुढील महिन्यात मार्चपासून या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.

मर्दानीच्या सिक्वलमध्येसुध्दा राणी मुखर्जी पुन्हा एकदा धडाकेबाज पोलिस ऑफीसरच्या भूमिकेत समोर येणार आहे. ह्यात ती एका 21 वर्षीय खलनायकासोबत दोन हात करेल. यशराज फिल्म्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणी मुखर्जी येत्या 18 मार्चपासून या सिक्वलची शूटींग सुरु करेल. हे मुंबईतील एक छोटं शेड्यूल असेल.

राणी मुखर्जीचे पती आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेला 'मर्दानी 2' हा ब्लॉकबस्टर हिचकीनंतरचा दुसरा सिनेमा आहे. नवोदित दिग्दर्शक गोपी पुथरन या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive