By  
on  

PulwamaTerrorattack: शबाना-जावेद अख्तर यांनी नाकारलं पाकिस्तानचं निमंत्रण

काश्मीरमधील पुलवामा येथे लष्करांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपुर्ण देशावर उमटत आहेत. बॉलिवूडकरांनीही या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. कराची आर्ट कॉन्सिलकडून जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कैफी आझमी यांच्या साहित्याची चर्चा करण्यासाठी कराची साहित्य महोत्सवाचं आमंत्रण आलं होतं.  या निमंत्रणानुसार या दोघांनी कराचीला जाण्याचं नक्कीही केलं होतं. पण कालच घडलेल्या या हल्ल्याचा निषेध म्हणून दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करून या दोघांनीही हा निर्णय जाहीर केला आहे.

https://twitter.com/Javedakhtarjadu/status/1096315621610946561

 

https://twitter.com/AzmiShabana/status/1096100074650619905

Recommended

PeepingMoon Exclusive