By  
on  

सैराट आता मालिकेच्या स्वरुपात येणार रसिकांच्या समोर येणार का? रसिकांमध्ये उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीत सैराट हा सिनेमा मैलाचा दगड असल्याचं सिद्ध झालं आहे. कथा, पटकथा, संगीत, अभिनय या सर्वच बाबतीत हा सिनेमा वरचढ ठरला आहे. या सिनेमाने मराठी जनांनाच नाही तर हिंदीतील प्रेक्षकांनाही भुरळ घातली होती. त्यामुळे या सिनेमाचा हिंदी रिमेकही बनवला गेला. हिंदीमध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी या सिनेमातून पदार्पण केलं होतं. आता सिनेमावर हिंदीत मालिका येणार असल्याचं वृत्त ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलं होतं.

अभिनेते कमल नारायण राजवंशी या मालिकेत खलनायकी व्यक्तिरेखेत दिसतील. अभिनेत्री म्हणून या मालिकेत एखादा नवीन चेहरा आणायचा निर्मात्यांचा मानस आहे. खरं तर मराठी सैराटच्या तुलनेत हिंदीतील धडकला तितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यामुळे मालिका ही प्रसिद्धी मिळवेल का ते वेळ आल्यावर कळेलच.

Recommended

PeepingMoon Exclusive