By  
on  

रिलेशनशीप स्टेटसबद्द्ल काय म्हणते कतरिना कैफ, मुलाखतीमध्ये केला खुलासा

कतरिना कैफच्या सौंदर्याचे फॅन्स बॉलिवूडमध्ये जितके आहेत, तितकेच  बॉलिवूडच्या बाहेरही आहेत. अनेक सौंदर्यवती अभिनेत्रींमध्ये कतरिनाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कतरिनाच्या सिनेमाची, अभिनयाची, आयटम सॉन्गशी जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा तिच्या रिलेशनशीप स्टेटसची देखील होते. सिंगल असलेली कतरिना मिंगल कधी होणार याचे काळजी तिचे चाहते नेहमीच करत असतात.

https://www.instagram.com/p/Bta-8Rygzds/?utm_source=ig_web_copy_link

रणबीरसोबतच्या नात्याला नाव मिळणार असं वाटत असतानाच या जोडीचं वेगळं होणं सगळ्यांसाठीच धक्का होता. विशेष म्हणजे रणबीरने कतरिनाची खास मैत्रीण आलिया भट हिच्याशी सुत जमवलं. त्यामुळे कतरिना आणि आलिया यांच्या नात्यावर परिणाम होणार का याविषयी अनेक चर्चा झाल्या. आलिया आणि कतरिनानेही या विषयी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. पण आता पहिल्यांदाच कतरिनाने या विषयावर तोंड उघडलं आहे. या विषयावर कतरिना म्हणते, रणबीरमुळे माझ्या आणि आलियाच्या नात्यात कोणताही दुरावा आलेला नाही.’ ‘आमची मैत्री अजुनही कायम आहे.’

कतरिना रिलेशनशीप स्टेटसबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा ती म्हणते, ‘अजून काहीच स्पष्ट नाहीये, पुढे काय होईल ते मलाही माहीत नाही. सध्या तरी मी सिंगल आहे.’

https://www.youtube.com/watch?v=IGwlgwgwVPY

 

Recommended

PeepingMoon Exclusive