By  
on  

अनुष्का शर्माने एलजीबीटीक्यू समुदायासाठी केलं हे काम, पाहा म्हणते अनुष्का

अनुष्का शर्मा एक उत्तम अभिनेत्री आहे हे सगळ्यांना ठावूक आहेच. पण अनुष्का उत्तम व्यक्तीही आहे याचा प्रत्ययही अनेकांना आला आहे. अनुष्का आता एलजीबीटीक्यू समुदायाच्या हक्कांसाठी काम करणा-या नाज फाउंडेशनशी जोडली गेली आहे. अनुष्काने नाज फाउंडेशनसोबत हातमिळवणी केली आहे. हे फाउंडेशन एलजीबीटीक्यू समुदायाच्या अधिकारासाठी काम करते. सुत्रांच्या माहितीनुसार ‘नुश फॉर लव्ह’च्या संग्रहातून होणारा नफा या फाउंडेशनला दिला जाणार आहे. याद्वारे लोकांना एलजीबीटीक्यू फाउंडेशन विषयी माहिती व्हावी याहेतूने अनुष्काने हे पाऊल उचलल्याचं समजलं आहे.

https://twitter.com/NushBrand/status/1087951134914940928

एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करण्यामध्ये नाज फाउंडेशनने कायमच महत्त्वाची भूमिका घेतली आहे. मागील वर्षापुर्वी नाज फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवरुन कलम ३७७मध्ये बदल केला गेला होता. एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेणं ही वेळ अनुष्कावर पहिल्यांदा आली नाही. अनुष्काने तिच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावरील प्राण्यांसाठी मुंबईच्या बाहेर घर बनवणार आहे. या घरात या जनावरांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. अनुष्काच्या या निर्णयाचं लोकांनी खुप कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/Bt0jX15HROd/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive