‘टोटल धमाल’ नंतर हा सिनेमाही होणार नाही पाकिस्तानात रिलीज, निर्मात्यांची घोषणा

By  
on  

पुलवामामधील लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या परीने या हल्ल्याचा निषेध नोंदवत आहे. बॉलिवूड्करांनीही विविध मार्गांनी आपल्या देशभक्तीला वाव दिला आहे. अलीकडेच ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचा सिनेमा पाकिस्तानात रिलीज न करण्याचं ठरवलं आहे. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांनी ट्वीट करून हे जाहीर केलं आहे. टोटल धमाल निर्मात्यांच्या या घोषणेनंतर बॉलिवूड्मध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

https://twitter.com/taran_adarsh/status/1097765901217148930

सिनेमा समीक्षक तरन आदर्श यांनीही अलीकडेच एक ट्वीट केलं आहे. यात ट्वीट्मध्ये टोटल धमालच्या निर्मात्यांनंतर ‘लुका छुपीचे’ निर्माते  दिनेश विजन यांनीही आपला सिनेमा पाकिस्तानात रिलीज ना करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दिलजीत दोसांज स्टारर सिनेमा ‘अर्जुन पटियाला’देखील पाकिस्तानमध्ये रिलीज होणार नाही. याशिवाय सलमाननेही आपला सिनेमा ‘नोटबूक’ आणि ‘भारत’ यातून आतिफ अस्लमचं गाणं हटवलं गेलं आहे. अशा प्रकारे देशातील प्रत्येकजण पाकिस्तानविरोधी भावना व्यक्त करत आहे.

 

 

Recommended

Loading...
Share