By  
on  

‘बदला’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, दिसली तापसीच्या मनातली उलाघाल

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘बदला’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात नेहमी डॅशिंग रोल करणारी तापसी हळव्या रुपात दिसत आहे. या गाण्यात तिच्या मनातील भावनिक आंदोलनं स्पष्ट दिसून येत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=9aaRllt7VP0

‘क्यु रब्बा’ अशी सुरुवात असलेल्या गाण्यात तापसी आणि तिचं कुटुंब दिसत आहे. या गाण्यात तिच्यासोबत घडत असलेला सगळा प्रकारही दाखवला गेला आहे. हे गाणं अरमान मलिक यांनी गायलं आहे. तर अमाल मलिकने संगीतबद्ध केलं आहे. मर्डर मिस्ट्रीमध्ये अडकलेल्या तापसीला वाचवायला या सिनेमातही अमिताभ येणार आहेत. या सिनेमात अमिताभ एका वकिलाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. बादल गुप्ता असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. गेल्या ४० वर्षांत एकही केस न हरलेला वकील अशी बादल गुप्ता यांची ख्याती असते. हा सिनेमा सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केला आहे. सुजॉय यांनी यापूर्वी ‘कहानी’, ‘कहानी 2’ सारखे शानदार चित्रपट दिले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive