By  
on  

फरहान अख्तर-शिबानी यांची पहिली ‘लव्ह-इन-अ‍ॅनिव्हर्सरी’, फरहानने अशा व्यक्त केल्या भावना

बॉलिवूड्मध्ये लव्हबर्ड्सची कमतरता नाही. पण त्यातही सदैव लाईमलाईटमध्ये असणारं नाव म्हणजे फरहान अख्तर-शिबानी. अनेक ठिकाणी हे दोघंही एकत्र हजेरी लावत असतात. नुकतंच फरहान आणि शिबानीच्या नात्याला एक वर्ष पुर्ण झालं आहे. सोशल मिडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. फरहानने आपल्या अकाउंटवऊन एक फोटो शेअर करत, तीन, सहा, पाच (३६५) असं लिहिलं आहे तर फरहानप्रमाणेच शिबानीनेही असाच फोटो शेअर करत फरहानला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BuJfyjwhQrP/?utm_source=ig_web_copy_link

याशिवाय फरहान आणि शिबानीने एका व्हेकेशनचा फोटोही शेअर केला आहे. कामाच्याबाबतीत बोलायचं तर फरहान, प्रियांका चोप्रा आणि जायरा वसीम यांच्यासोबत ‘स्काई इज पिंक’मध्ये दिसून येईल. शिबानीसोबत फरहानच्या मुलाचं ट्युनिंग छान जुळत असल्याने लवकरच ते पुढचं पाऊल उचलणार असल्याचे समजते.

https://www.instagram.com/p/BuFmCSdBr56/?utm_source=ig_web_copy_link

 

दीपिका-रणवीरच्या बहुचर्चित रिसेप्शन पार्टीत फरहान आणि शिबानी हे एकत्रच उपस्थित होते. तेव्हा तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरुनच त्यांच्या नात्याबाबत सर्वांना चांगलीच कल्पना आली होती. तसंच ते आत्ता खुल्लम खुल्ला एकत्र हिंडतात. म्हणून लवकरच ते आपल्या नात्याला अधिकृतचं शिक्कामोर्तब करण्यासाठी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतील अशी चर्चा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive