By  
on  

अक्षय कुमारची सामूहिक विवाहसोहळ्यातील नवदाम्पत्यांना प्रत्येकी 1 लाखाची मदत

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा आपल्या अभिनय आणि सिनेमांपेक्षा त्याच्या सामाजिक कार्यातील पुढाकारामुळे नेहमीच चर्चेत असतो. संवेदनशील अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार हे नाव आघाडीवर आहे. तो नेहमीच आपलं सामाजिक भान जपताना पाहायला मिळतो. याचा प्रत्यय नुकताच बीडमध्ये आला.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने परळीतील दुष्काळग्रस्त भागातील सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुहीक विवाह सोहऴ्याचं आयोजन 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. या सर्वात मोठ्या विवाह सोहळ्यासाठी अक्षय कुमारची खास बीडमध्ये उपस्थिती होती. परळीतील या सामूहिक विवाहसोहळ्यात अक्षय कुमारसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी कौतुकास्पद आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अक्षय कुमारने या सर्वच 100 जोडप्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची धनादेश देऊन मदत केली आणि उपस्थित सर्वांनीच या त्याच्या मदतीचं मनपूर्वक अभिनंदन केलं

महत्त्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अक्षयने एक छोटेखानी भाषण दिलं. त्यावेळी उपस्थितांनी त्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला आणि मग काय अक्षय चक्क छान मराठीत बोलू लागला, व त्याने सर्वांचीच मनं जिंकली. नवविवाहित जोडप्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत त्यांना सुखी जीवनाचा मंत्र दिला.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1098981816504147970

Author

Recommended

PeepingMoon Exclusive